
भाजपच्या किसान मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्षपदी श्रीनिवास मोरे यांची नियुक्ती
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील आर्डी येथील श्रीनिवास केशव मोरे यांची भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्याच्या किसान मोर्चा जिल्हाध्यक्षदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मोरे यांची भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी नियुक्ती केली असून त्यांच्या या निवडीबद्दल तालुक्यातून सर्वत्र स्वागत केले जात आहे. संघटनेचे प्रतिनिधी म्हणून आपण सरकार व जनता यामधील दुवा बनून, केंद्रातील नरेंद्र मोदी, महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या लोककल्याणकारी योजना तसेच पक्षाचे ध्येय धोरण जनमानसात प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे श्रीनिवास मोरे यांनी सांगितले.

Leave a Reply