१२ व २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या १२० शिक्षकांचे श्रेणी प्रशिक्षण, शैक्षणिक नवोपक्रम, कृती संशोधनावर भर

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील साने गुरुजी विद्या मंदिरात तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व खाजगी शाळांमधील शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण उत्साहात पार पडले. १३ ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजित या प्रशिक्षणात १२ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या ८०, तर २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या ४० अशा एकूण १२० शिक्षकांनी सहभाग नोंदवून प्रशिक्षण पूर्ण केले.

प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांनी विविध स्वाध्याय, कृती संशोधन आणि शैक्षणिक नवोपक्रम सादर केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यापनात नवनवीन पद्धतींचा वापर कसा करता येईल, यावर विशेष भर देण्यात आला. प्रशिक्षणाच्या शेवटी शिक्षकांची ५० गुणांची परीक्षा घेण्यात आली. प्रशिक्षणार्थी शिक्षकांना आनंदा बापू धनगर, सर्जेराव शिसोदे, सोपान भवरे, रवींद्र देवरे आणि मंगेश पाटील यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. प्रशिक्षण समन्वयक म्हणून किरण शिसोदे, रवींद्र साळुंखे, चंद्रकांत साळुंखे, तुषार बाविस्कर, देवेंद्र पाटील, प्रशांत पाटील, किशोर पाटील, महेंद्र पाटील व पंकज काटे यांनी जबाबदारी सांभाळत प्रशिक्षणाचे नियोजन केले. प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे प्रमुख उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची नोंद घेण्यात आली. अनुभवी शिक्षकांना अद्ययावत शैक्षणिक पद्धतींचे प्रशिक्षण मिळाल्याने तालुक्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *