
जिल्हा बँक निवडणुकीसाठी महायुतीचे शक्तिप्रदर्शन; अमळनेरात आज भव्य मेळावा
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून अमळनेरात आज मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता धुळे रोडवरील कलागुरू मंगल कार्यालयात हा मेळावा होणार असून, यात महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ठरावधारक मतदार एकत्र येणार आहेत.
अमळनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणारे महायुतीचे सर्व पदाधिकारी, सोसायट्यांचे ठरावधारक मतदार तसेच जिल्हा बँक निवडणुकीतील मतदार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, या मेळाव्याला जळगाव जिल्ह्यातील सर्व मंत्री, खासदार, आमदार तसेच जिल्हा बँकेचे सर्व उमेदवार प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अमळनेर तालुक्यातील सर्व सोसायटी ठरावधारक मतदार, जिल्हा बँक निवडणुकीतील मतदार आणि महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन महायुती अमळनेर तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply