धनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार; १५ ऑक्टोबरला धुळ्यात महामोर्चा!

दिपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची तयारी; अमळनेरमध्ये घोंगडी बैठक

अमळनेर (प्रतिनिधी) धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी १५ ऑक्टोबर रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. संघर्षयोद्धा दिपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या आंदोलनाच्या तयारीसाठी अमळनेर येथील जुन्या टाऊन हॉलमध्ये धनगर समाजाची घोंगडी बैठक घेण्यात आली. यावेळी दिपक बोऱ्हाडे यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. महामोर्चा यशस्वी करण्यासाठी सकल धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धनगर समाजाला हक्काच्या आरक्षणाची अंमलबजावणी मिळावी, यासाठी गेल्या सत्तर वर्षांपासून संघर्ष सुरू असल्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली. जालना आणि परभणी येथे महामेळावे घेतल्यानंतर आता तिसरा महामेळावा १५ ऑक्टोबर रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहे. या आंदोलनातून सरकारला आरक्षणाच्या मागणीबाबत इशारा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. महामोर्चा यशस्वी करण्यासाठी दिपक बोऱ्हाडे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात दौरे करून समाजबांधवांना एकत्रित करीत आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून अमळनेरमध्ये घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *