अजय भामरे यांच्या तक्रारीवरून राजकुमार छाजेड यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील ‘लेखन मंच’चे कार्यकारी संपादक अजय भामरे यांच्या तक्रारीवरून ‘सचोटी’ न्यूज चॅनलचे संपादक राजकुमार छाजेड यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातिवाचक शिवीगाळ, धमकी तसेच अन्य आरोप केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याबाबत अजय भामरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पत्रकारितेच्या कामाच्या अनुषंगाने राजकुमार छाजेड यांच्याकडून जातिवाचक शब्दांचा वापर करून शिवीगाळ व धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत यापूर्वी जळगाव पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३५१(२) व ३५२, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ मधील कलम ३(१)(प), ३(१)(क्यू), ३(१)(आर), ३(१)(एस) व ३(२)(व्हीए) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. प्रकरणातील तक्रार, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींचे जबाब यांच्या आधारे पुढील तपास करण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे पत्रकारिता क्षेत्रातही चर्चेला सुरुवात झाली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *