दहिवद शिवारातून १ लाख ३५ हजारांची पाच जनावरे चोरीला

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद शिवारात अज्ञात चोरट्याने तीन म्हशी, एक गाय आणि एक वासरू अशी पाच जनावरे दोर कापून चोरून नेल्याची घटना ३ रोजी रात्री ते ४ रोजी सकाळदरम्यान घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे १ लाख ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दहिवद येथे शेतकऱ्यांनी आपल्या खळ्यात व गोठ्यात जनावरे बांधून ठेवली होती. त्यापैकी भूषण नारायण माळी यांची एक म्हैस, जितेंद्र बाबूलाल माळी यांची एक म्हैस, तसेच साहेबराव सुरेश माळी यांची एक म्हैस, एक गाय व एक वासरू अशी पाच जनावरे अज्ञात चोरट्याने दोर कापून चोरून नेली. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *