
एकलव्य संघटनेच्या अमळनेर तालुका बैठकीत आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर केले मंथन
दफनभूमी, घरकुल, रेशनकार्ड, आधारकार्ड व वनजमिनीच्या प्रश्नांवर घेतली आक्रमक भूमिका

अमळनेर (प्रतिनिधी) : एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली अमळनेर येथे २९ ऑगस्ट रोजी तालुका बैठक घेण्यात आली. बैठकीत संघटनेच्या विविध नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीत तालुक्यातील आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये दफनभूमी, घरकुल, रेशनकार्ड, आधारकार्ड, वनजमीन, गायरान जमीन आणि गावठाण जमीन यांसह शहर व ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध मूलभूत समस्यांचा आढावा घेण्यात आला. शहर तसेच ग्रामीण भागातील अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याचे बैठकीत मांडण्यात आले. संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. समाजातील पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजना आणि मूलभूत सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. बैठकीस प्रमुख मान्यवर म्हणून ‘खबरीलाल’चे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ठाकूर, एकलव्य संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गुलाब बोरसे, जळगाव जिल्हा अध्यक्ष सुनील पवार, जिल्हा उपाध्यक्ष हिलाल गायकवाड, जिल्हा युवा उपाध्यक्ष रमेश सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष विनायक सोनवणे, अमळनेर तालुकाध्यक्ष भैय्या सोनवणे उर्फ भुरा भाऊ, तालुका उपाध्यक्ष आबा बहिरम, पारोळा तालुका उपाध्यक्ष किशोर वाघ, शहराध्यक्ष सुधाकर पवार, शहर उपाध्यक्ष धनराज मालचे, रावण ग्रुप अध्यक्ष नरेश चव्हाण, उपाध्यक्ष अजय भाऊ, सदस्य ज्ञानेश्वर भाऊ, तालुका युवा अध्यक्ष अजय मालचे, तालुका सचिव पुनम सिंग, चांदणी कुरे, टाकरखेडे गटप्रमुख नाना बोरसे, टायगर फोर्स अध्यक्ष आबा गायकवाड, मंगरूळ गटप्रमुख आकाश पवार, तालुका उपसचिव सुनील ठाकरे, युवा उपाध्यक्ष धनराज गायकवाड, मांडळ गटप्रमुख प्रवीण भिल, जानवे गटप्रमुख भरत भिल, अजय भिल आणि आकाश भिल यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या हक्कांच्या आणि मूलभूत प्रश्नांसाठी संघटना आगामी काळात अधिक आक्रमकपणे काम करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply