
भाजप भटके-विमुक्त आघाडीच्या जळगाव पश्चिम जिल्हा कार्यकारिणीत दीपक भोईंची उपाध्यक्षपदी निवड
अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या जळगाव पश्चिम जिल्हा भटके-विमुक्त आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणी २०२६ मध्ये अमळनेर येथील कार्यकर्ते दीपक भटू भोई यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे अमळनेर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांच्या आदेशाने तसेच जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी आणि विभागीय संघटनमंत्री रविजी अनासपुरे यांच्या मान्यतेनंतर ही जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे तसेच जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष गणेश जयराम जाने यांनी भटके-विमुक्त आघाडीची कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत अमळनेरचे दीपक भटू भोई यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल अमळनेर परिसरातील कार्यकर्त्यांसह अंबरशी टेकडी ग्रुप आणि भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

Leave a Reply