
दिव्यांग विद्यार्थ्यांना अन्नदान व वस्त्रदान; पारोळ्यात सेवाभावी उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) पारोळा येथील चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींच्या निवासी शाळेत अमळनेर लायन्स क्लब व श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपच्या वतीने अन्नदान व वस्त्रदान कार्यक्रम उत्साहात झाला. प्रकाशचंद्र हिरालाल पारख आणि गोविंद रमेशचंद्र अग्रवाल यांच्या योगदानातून आयोजित या उपक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांना कपड्यांचे वाटप करून मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
कार्यक्रमाला लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र प्रकाशचंद्र पारख, माजी नगराध्यक्ष विनोद भैय्या पाटील, खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, निवृत्त प्रशासन अधिकारी संजय चौधरी, अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, लायन्स क्लबचे सचिव प्रा. जयेश गुजराथी, जळगाव जनता बँकेचे शाखाधिकारी महेश गर्गे, पर्यांक पटेल, विजय पारख, सौ. कविता पारख, सौ. उषाबाई पारख, पत्रकार किरण पाटील, डॉ. संदीप सराफ, प्रवीण पारख, हैबतराव पाटील, अर्जुन पाटील, रघुनाथ पाटील, करमचंद ताथेड, विरेंद्र वाघवाणी, जयदीप राजपूत, अतुल राजपूत, महेश राजपूत, निखिल पारख, किरण पाटील, गुणवंत पाटील तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांची विशेष उपस्थिती होती. महिला भगिनीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या अध्यक्षांकडून सत्कार करण्यात आला. प्रकाशचंद्र पारख तसेच निखिल पारेख यांनी संस्थेचे संस्थापक आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी विशेष विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप करून मिष्ठान्न भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश सोनवणे सर यांनी केले, तर शाळेची माहिती देऊन हेमंत महाजन यांनी आभार मानले. यावेळी शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. प्रकाशचंद्र हिरालाल पारख हे महावीर पतपेढी, अमळनेरचे चेअरमन असून गोविंद रमेशचंद्र अग्रवाल हे मोहन कृषी उद्योगाचे उद्योजक आहेत.

Leave a Reply