शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. प्रशांत साळुंखे; उपाध्यक्षपदी आर. ओ. पाटील बिनविरोध

अमळनेर (प्रतिनिधी ) धुळे व नंदुरबार जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालय शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची सभा उत्साहात पार पडली. उपनिबंधक सहकारी संस्था धुळे तालुका तथा प्राधिकृत अध्यक्ष अधिकारी श्रीमती वृषाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.

यामध्ये अध्यक्षपदी प्रा. प्रशांत वासुदेव साळुंखे, तर उपाध्यक्षपदी आर. ओ. पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. टी. पी. शिंदे, साधना शिंदे, माजी अध्यक्ष आर. आर. पाटील, विजय पाटील, प्रा. उमेश गांगुर्डे, भूषण पाटील, शिवाजी जाधव, अजय सूर्यवंशी, किरण पाटील, संतोष बागूल, विजया बेहरे, नरेंद्र भामरे, मधुकर अहिरे, व्यवस्थापकीय संचालक दिनेश पाटील तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अश्विनी पाटील, कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. रावसाहेब शिंदे, सचिव सुनिता शिंदे, मारवड संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, प्रा. अरविंद जाधव तसेच माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

प्रा. प्रशांत साळुंखे व आर. ओ. पाटील यांच्या निवडीबद्दल खासदार स्मिता वाघ, आमदार राम भदाणे, आमदार अनुप अग्रवाल, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील आदींनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *