तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत ॲड. ललिता पाटील स्कूलचे वर्चस्व; ११ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड

अमळनेर (प्रतिनिधी) ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कॅरम व मैदानी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विविध प्रकारांत विजेतेपद मिळवले. या कामगिरीच्या जोरावर ११ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, शाळेच्या शिरपेचात चौथ्यांदा विजयाचा तुरा रोवला गेला आहे.

अमळनेर येथे ४ ऑक्टोबर रोजी क्रीडा व युवक कल्याण विभाग, पंचायत समिती अमळनेर आणि तालुका क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कॅरम व मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जययोगेश्वर शाळा तसेच तालुका क्रीडा संकुल, अमळनेर येथे झालेल्या या स्पर्धांमध्ये ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या १४ व १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कॅरम स्पर्धेत ऐश्वर्या साळुंके, समीक्षा नेरकर आणि कुंज माळी यांनी बाजी मारली. मैदानी स्पर्धेत जान्हवी कुंभार हिने १०० मीटर, उंच उडी व लांब उडी; मेश्ववा धनगर हिने हॅमर थ्रो व गोळाफेक; रिधी पाटील हिने ८० मीटर अडथळ्याची शर्यत व २०० मीटर; कृष्णा पाटील हिने भालाफेक व २०० मीटर; गणेश चौधरी याने गोळाफेक; निर्विघ्यण पाटील याने हॅमर थ्रो, तर श्लोक महाजन याने थाळीफेक या प्रकारांत विजेतेपद मिळवले. या कामगिरीमुळे संबंधित विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील यांनी विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तर प्राचार्य डॉ. नीरज चव्हाण यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक केदार देशमुख, सागर चावरिया, रमेश धनगर आणि ममता पाटील यांनी परिश्रम घेतले. शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून, त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन तालुका क्रीडा संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील वाघ यांनी उत्तमरित्या केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *