
प्रताप महाविद्यालयाचा खेळाडू रोहित पाटील ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेसाठी पात्र
अमळनेर(प्रतिनिधी) अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धेत क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत यश मिळविले. या संघातील प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू रोहित सर्जेराव पाटील (टी.वाय.बी.ए.) याची ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याचे सर्वत्र स्वागत होऊन कौतुक करण्यात येत आहे.
रोहितच्या या उल्लेखनीय यशामुळे प्रताप महाविद्यालयासह अमळनेर शहराचा नावलौकिक वाढला असून, विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर रोहितने ही यशाची शिखरे गाठली आहेत. त्याच्या या यशाबद्दल खा. शि. मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष माधुरी पाटील, कमल कोचर, विश्वस्थ वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष सीए निरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, जेष्ठ संचालक हरी भीका वाणी, संचालक योगेश मुंदडा, डॉ. संदेश गुजराती, प्रदीप अग्रवाल, पंकज मुंदडे, संचालिका लिना पाटील, मंडळ सचिव प्रा. पराग पाटील, प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील आदी मान्यवरांनी त्याचे विशेष कौतुक केले. तसेच प्रा. पराग पाटील, डॉ. ए. जे. पाटील, डॉ. विजय मांटे, डॉ. योगेश तोरवणे, सीसीएमसी प्रमुख डॉ. विजय तुंटे, जिमखाना समन्वयक प्रा. डॉ. संदीप नेरकर, आयक्यूएसी प्रमुख डॉ. मुकेश भोळे, क्रीडा संचालक व व्यवस्थापक प्रा. डॉ. सचिन पाटील, प्रा. अमृत अग्रवाल, रजिस्ट्रार राकेश निळे, प्रा. अर्चना पाटील, सचिन वाघ, संजय पवार, प्रशांत देवकते तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व खेळाडूंनी रोहितचे कौतुक केले. रोहितच्या या यशामुळे परिसरातील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यास प्रेरणा मिळत आहे

Leave a Reply