आग्रही आग्रह सोहळा भक्तिरसात रंगला; माऊलींच्या गणरायाच्या दर्शनासाठी अमळनेरकरांची मांदियाळी

अमळनेर (प्रतिनिधी) श्री संत सखाराम महाराज माऊली मित्र मंडळाच्या वतीने आयोजित ‘आग्रही आग्रह’ सोहळ्याला अमळनेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वाडी चौक येथे झालेल्या या भक्तिमय सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह असंख्य नागरिकांनी उपस्थिती लावत माऊलींच्या गणरायाचे प्रथम दर्शन घेतले.

वेदपाठशाळेचे मंत्रोच्चार, वारकरी संप्रदायाची भक्तिमय उपस्थिती, सुप्रसिद्ध शहनाई वादक देवश्री गुरव यांचे सुरेल सादरीकरण आणि आकर्षक आतषबाजीने सोहळ्याला विशेष रंगत आली. यावेळी अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी उपस्थित राहून सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. पत्रकार जितेंद्र ठाकूर, पत्रकार रवींद्र मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती होती. भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या सोहळ्यामुळे वाडी चौक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. माऊलींच्या जयघोषाने आणि गणरायाच्या भक्तिमय वातावरणाने वाडी चौक दुमदुमून गेला. मंडळाच्या नियोजनबद्ध आयोजनामुळे सोहळा उत्साहात व शांततेत पार पडला. उपस्थित नागरिकांनी आयोजकांचे कौतुक करत अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा कायम राहावी, अशी भावना व्यक्त केली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *