राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत अशोकराव हिरे यांची नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी)  येथील जी. एस. हायस्कूलचे उपशिक्षक उमाकांत अशोकराव हिरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अमळनेर शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी ही नियुक्ती जाहीर केली. आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते उमाकांत अशोकराव हिरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी चेतन राजपूत, निलेश महाजन, प्रकाश जैन, आर. जे. पाटील, शिक्षक भारती संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल वाघ, साने गुरुजी पतपेढीचे संचालक रोहित तेले, राहुल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियुक्तीनंतर बोलताना उमाकांत अशोकराव हिरे यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. शिक्षकांच्या हिताचे प्रश्न सोडविणे आणि त्यांना संघटनात्मक बळ देणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. त्यांच्या नियुक्तीबद्दल शिक्षक, सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *