राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे शासकीय कार्यालये आणि महाविद्यालयांना प्रतिमेच्या फोटोफ्रेम भेट

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व लोकनेते स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेर यांच्या वतीने विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच महाविद्यालयांना स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांच्या प्रतिमेच्या फोटोफ्रेम भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

महाराष्ट्र शासनाने सन २०२६ पासून २२ जुलै रोजी स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयानुसार संबंधित कार्यालयांमध्ये त्यांची प्रतिमा उपलब्ध व्हावी आणि जयंती सन्मानपूर्वक साजरी करता यावी, या उद्देशाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष मनीष पाटील, तालुकाध्यक्ष प्रणव चौधरी आणि कार्याध्यक्ष हुजैफा पठाण यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा युवकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष गोविंदा बाविस्कर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुनील शिंपी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोशल माध्यम विभागाचे जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दुर्गेश पाटील, शहर कार्याध्यक्ष भूषण लोहार, उपाध्यक्ष चैतन्य संदानशिव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष कृष्णा पाटील, राष्ट्रवादी सोशल माध्यम विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष करण साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदीप सांगोरे, तालुकाध्यक्ष प्रणव चौधरी, शहराध्यक्ष मनीष पाटील, कार्याध्यक्ष हुजैफा पठाण, सोशल माध्यम शहराध्यक्ष रोहित सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोषाध्यक्ष कुशल पाटील, विद्यार्थी काँग्रेसचे सहसचिव चेतन बोरसे, सरचिटणीस तुषार ठाकरे, युवक उपाध्यक्ष वरद कासार, युवक उपाध्यक्ष मोहित शिंदे, युवक चिटणीस विवेक निकम, युवक चिटणीस प्रशांत महाजन, युवक सरचिटणीस अभय महाजन, आदित्य संदानशिव, यश पवार, योगेश पाटील, अनिकेत पाटील, हितेश महाजन, चिन्मय पाटील, उमेश पाटील, भविष्य देशमुख, सुमित मेडिस्कर आणि प्रशांत चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *