धार विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी सुमनबाई पवार यांची बिनविरोध निवड

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील धार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी सुमनबाई मधुकर पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांचा सत्कार धार गावाचे ज्येष्ठ नेते, माजी सरपंच तसेच एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन गणेश धोंडू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सोसायटीच्या सर्व संचालकांचाही सत्कार करण्यात आला.

सुमनबाई पवार यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या व विद्यमान नगरसेविका जयश्री अनिल पाटील यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत अभिनंदन केले. निवडणूक अधिकारी म्हणून महाजन यांनी तर संस्थेचे सचिव भावसार यांनी निवड प्रक्रियेचे कामकाज पाहिले. कार्यक्रमास विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, माजी चेअरमन, माजी सरपंच तसेच गावातील ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अलीम मुजावर यांनी केले. सुमनबाई पवार यांच्या बिनविरोध निवडीमुळे धार गावात समाधानाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *