कसाली मोहल्ला परिसरातील पाणी पुरवठ्याची वेळ बदलण्याची मागणी

युवा नेते व नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला दिले निवेदन

 

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील कसाली मोहल्ला परिसरातील पाणी पुरवठ्याची वेळ बदलण्याची मागणी येथील युवा नेते व नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. युवा नेते नईम पठाण यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी याबाबत नगर पालिकेला लेखी निवेदन देऊन होत असलेल्या गैरसोयींकडे लक्ष वेधले.

नगरपालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कसाली मोहल्ला भागात पाणी पुरवठ्याची वेळ पहाटे ४ वाजता आहे. ही वेळ रहिवाशांसाठी, विशेषतः महिलांसाठी अत्यंत गैरसोयीची ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पहाटेच्या वेळी पाणी येत असल्यामुळे नागरिकांच्या झोपेचा खोळंबा होत असून महिलांना लहान मुलांना घेऊन पाणी भरण्यासाठी उठावे लागते. ही बाब कष्टदायक आणि असुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पाणी पुरवठ्याची वेळ बदलून सकाळी ७ ते ९ किंवा संध्याकाळी ६ ते ८ या दरम्यान करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीसाठी युवा नेते नईम पठाण यांच्यासह अफरोज मिस्त्री, ईस्त्याक मोलाना, जुनेद शेख, राजा पठाण आणि रिजवान मन्यार यांनी नगरपरिषदेकडे पाठपुरावा केला आहे. प्रशासनाने नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *