तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रप्रेमाचा जागर; अमळनेर शहरासह तालुक्यातील शाळांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

अमळनेर (प्रतिनिधी)  भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमळनेर शहर व तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वजारोहण, प्रभातफेरी, तिरंगा रॅली, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, गीत गायन स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि राष्ट्रप्रेम जागविणारे विविध उपक्रम उत्साहात पार पडले. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता.

 

ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल

 

ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव प्रा. श्याम पाटील, प्राचार्य डॉ. नीरज चव्हाण, श्रीरंग पाटील, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहिली. इयत्ता दहावीची विद्यार्थिनी सिद्धी मगरे हिने महिलांविषयी आपले विचार व्यक्त केले. शिक्षिका सोनाली कोळी आणि शिक्षक जावेद पिंजारी यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व पटवून दिले. प्राचार्य डॉ. नीरज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हाने व कर्तव्यांची जाणीव करून देत मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात ॲड. ललिता पाटील यांनी वाढता दहशतवाद, महिलांची असुरक्षितता, वाढते अत्याचार आणि युवकांवर होणाऱ्या अन्यायाविषयी खंत व्यक्त करत, “जेव्हा आपल्या देशातील युवक सुरक्षित होतील आणि त्यांना योग्य न्याय मिळेल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो असे म्हणता येईल,” असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैक्षणिक विभाग प्रमुख विलास पाटील तसेच विद्यार्थिनी सिद्धी मगरे आणि शिफा नाज फकीर यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख राजकमल कोळी, राहुल चौधरी, योगिता सोनवणे आणि शीतल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल

 

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम Schoolमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन ध्वजवंदन आणि राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेसह उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात देशभक्तीचा संदेश देणाऱ्या रांगोळ्या आणि आकर्षक फुलांच्या पाकळ्यांनी सुंदर कलाकृती साकारण्यात आल्या होत्या. देशभक्तीपर गीते, घोषणा आणि विद्यार्थ्यांच्या वेशभूषेमुळे परिसर राष्ट्रभक्तीच्या भावनांनी ओतप्रोत भरून गेला होता.

मुख्याध्यापक जे. एस. देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना देशकर्तव्य, जबाबदारी आणि राष्ट्रनिष्ठा जपण्याचे आवाहन केले. यावेळी जलसंवर्धन व मृदासंवर्धनाची शपथ घेण्यात आली. रोटरी क्लब अमळनेरचे अध्यक्ष महेश पाटील, समस्त कार्यकारी संचालक मंडळ विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच १४ ऑगस्ट २०२६ रोजी शाळेच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व कार्यक्रमांनंतर हाऊसनिहाय राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. लहान आणि मोठ्या विद्यार्थ्यांचे स्वतंत्र गट तयार करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना उपहार स्वरूपात टॉफी आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले. स्पर्धेसाठी ज्येष्ठ गायक व संगीत विशारद शरद सोनवणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आफरीन शेख यांनी केले. कार्यक्रमासाठी चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही. पी. बडवे, प्रशांत वंजारी, राजश्री पाटील, रूपाली पाटील, योगिनी ओवे, व्ही. जी. बोरोले, भावना चौधरी, व्ही. एस. अमृतकर, श्वेता कलंत्री, अनंत बागल, विनायक सूर्यवंशी, योगिषा महाजन, सविता पारधी, कविता चौधरी तसेच समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

 

जिल्हा परिषद शाळा सुंदरपट्टी

 

जिल्हा परिषद शाळा सुंदरपट्टी, ता. अमळनेर येथे १५ ऑगस्टनिमित्त सुंदरपट्टी गावाच्या सुपुत्री आणि जळगाव येथील महिला पोलीस रूपाली शंकर धनगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कै. शंकर रामा धनगर यांच्या स्मरणार्थ रूपाली शंकर धनगर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप केले. यावेळी उपस्थित समस्त ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी रूपाली शंकर धनगर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला आणि शब्दसुमनांनी गौरव केला.

 

लोकमान्य विद्यालय व नवीन मराठी शाळा

 

लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित लोकमान्य विद्यालय आणि नवीन मराठी शाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शाळा परिसर तिरंगी फुगे, रिबन्स आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता.

सकाळी ७.२० वाजता लोकमान्य शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन, नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक अतुल भोई आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस विवेकानंद भांडारकर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

राष्ट्रध्वज फडकताच राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. त्यानंतर शाळेच्या सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधले. माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘ए वतन मेरे वतन’ या गीतावर समूहगीत सादर केले. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले आणि देशाचे सुजाण नागरिक बनण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद रमेश निळे यांनी केले.

 

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल

 

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे राजू महाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणापूर्वी विद्यार्थ्यांनी आकर्षक मार्चपास्ट सादर करून मानवंदना दिली. त्यानंतर राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. इयत्ता पहिली ते दहावीतील शंभर टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच “स्टुडंट ऑफ द इयर” पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी शाळेचे चेअरमन डी. डी. पाटील, अध्यक्षा सितीका अग्रवाल, संस्थापक अध्यक्ष नीरज अग्रवाल, संचालिका ममता अग्रवाल, आचल अग्रवाल, सल्लागार समिती सदस्य वसुंधरा लांडगे, अर्चना जोशी आणि भारती पाटील उपस्थित होत्या. मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. उपस्थित पालकांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.

 

स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय

 

मंगरूळ येथील स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात संचालिका पियुषा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावर्षी प्रथमच शासनाच्या आदेशानुसार ध्वजारोहणापूर्वी ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या पहाटे गावातून देशभक्तीपर घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली. विविध कार्यकारी सोसायटीत सदस्य विमलबाई बागुल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्रीकृष्ण चौकात इयत्ता दहावीमध्ये प्रथम आलेली नेहा दीपक पाटील हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत सदस्य दिनेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा समितीचे अध्यक्ष योगेश भिकन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि कवायती सादर केल्या. गुणवंत विद्यार्थिनी नेहा दीपक पाटील आणि सायली मोरे यांना शिक्षकांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. प्रभूदास पाटील आणि संजय पाटील यांनी कवायतीचे मार्गदर्शन केले. चारही ठिकाणच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. कार्यक्रमास सरपंच समाधान पारधी, उपसरपंच जितेंद्र पाटील, विश्वास पाटील, बापू गोबजी पाटील, चुनीलाल पाटील, मुरलीधर पाटील, श्रुती पाटील, रोशनी पाटील, मुख्याध्यापक प्रकाश पाटील, ग्रामसेवक कैलास जाधव, विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव अमोल पाटील, मनोहर पाटील, भटू पाटील, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल

 

तांबेपुरा येथील सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात, आनंदात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे भूपेंद्र जैन आणि शिल्पा जैन उपस्थित होते. भूपेंद्र जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे, कविता आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान, देशाची एकता, अखंडता आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याचा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून दिला. यावेळी भूपेंद्र जैन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्याचे महत्त्व स्पष्ट केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवून विद्यार्थ्यांनी देशप्रेम, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीची भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला. देशप्रेम, एकता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात झाला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *