साई’च्या जयघोषात अमळनेर ते शिर्डी पायी दिंडी रवाना

अमळनेर (प्रतिनिधी) सालाबादाप्रमाणे संताजी चौक, माळीवाडा येथील ओमसाई सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली अमळनेर ते शिर्डी पायी पदयात्रा शनिवारी सकाळी भक्तिमय वातावरणात शिर्डीकडे रवाना झाली.

साईबाबांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. ढोल-ताशे आणि ध्वनिवर्धकाच्या गजरात निघालेल्या दिंडीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. पदयात्रेच्या प्रारंभी पालखी पूजन नगरसेवक अनिल महाजन यांच्या हस्ते, तर रथ पूजन क्षत्रिय पारोळा यांच्या हस्ते करण्यात आले. पूजनानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मनोहर महाजन, नगरसेवक श्रीराम चौधरी, नगरसेवक राजू फापोरेकर, माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील, माजी नगरसेवक भाऊसाहेब महाजन, वसुंधरा लांडगे, अधिवक्ता तिलोत्तमा पाटील, मनोज शिंगाने, सुहास भामरे, गणेश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत साईबाबांची मूर्ती व छायाचित्र भेट देऊन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष संजय बापू चौधरी, डॉ. राजेंद्र पिंगळे, सुभाष मामा पाटील, जगन चौधरी, हरिष चौधरी, योगेश मकवाना, अरुण पाटील, यशवंत शिंगाने, यशवंत चौधरी, परेश चौधरी, नंदू शेठ चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ‘साईनाथ महाराज की जय’, ‘सबका मालिक एक’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. साईभक्तांच्या उत्साहपूर्ण सहभागात पायी दिंडीने अमळनेरहून प्रस्थान केले. पहिल्या टप्प्यात दिंडी धुळे येथे मुक्कामी रवाना झाली. तेथून पुढील प्रवास करत ही पदयात्रा शिर्डी येथे पोहोचणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ओमसाई सेवा समितीच्या या पायी पदयात्रेत साईभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून, संपूर्ण प्रवासात भक्तिमय वातावरण राहणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *