
कळमसरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रामपंचायतीने दिले सीटीव्ही कॅमेरे, प्रिंटर भेट
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे ग्रामपंचायतीतर्फे जि.प. प्राथमिक मुलांच्या शाळेला सीसीटीव्ही कॅमेरा व प्रिंटर भेट देण्यात आले. यामुळे मुलांची सुरक्षितता आबाधित राहणार असून पिंटरमुळे शाळेचे शालेय कामकाज सोपे होणार आहे. 
ग्रामपंचायतकडून शाळेस चार सीसीटीव्ही कॅमेरे एलसीडी मॉनिटर व मोठे प्रिंटर भेट देण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग राजपूत, ग्रा.प सदस्य दिनकर चव्हाण, ग्रा.पं. सदस्या मीनाबाई कुंभार, विस्तार अधिकारी कठाडे, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, ग्रामपंचायत अधिकारी वाघ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास भिल, उपाध्यक्ष वसंत महाजन, कन्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप महाजन, पत्रकार बाबूलाल पाटील व गजानन पाटील, व्यवस्थापन समिती सदस्य शितल भिल, पौर्णिमा वल्लर, सोनाली पारधी आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक किशोर सिसोदे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब मांगो पाटील व केंद्रप्रमुख अशोक सोनवणे यांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले.याप्रसंगी कन्या शाळेचे केशव बडगुजर, जयश्री बडगुजर व पालक सुनील पाटील, शांताराम पवार, कृष्णा भील उपस्थित होते. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना पाण्याच्या बॉटल मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भरत जाधव यांनी केले. स्वयंपाकी अर्चना कुंभार, योगेंद्रसिंग पाटील यांनी सर्व सहकार्य केले.

Leave a Reply