अमळनेरच्या पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी भाग्यश्री पाटील जिल्ह्यात तृतीय

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी भाग्यश्री पाटील हिने डॉ. होमी भाभा फॉउंडेशन, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय स्तरावरील परीक्षेत प्राविण्यसह उत्तीर्ण होत जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून तीचे कौतुक केले जात आहे.

या परीक्षा विज्ञान व इतर वैज्ञानिक विषयांवर आधारित ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची कसोटी पाहणारी तसेच त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला वाव देणारी ही स्पर्धा म्हणून ओळखली जाते. परीक्षेचे तीन टप्पे असून प्रत्येक टप्पा वेगवेगळ्या स्वरूपात घेतला जातो. पहिला व दुसरा स्तर अत्यंत अवघड प्रश्नांनी युक्त असतो. या दोन्ही स्तरांत यशस्वी ठरल्यानंतर तिसऱ्या स्तरावर मौखिक स्वरूपात प्रश्न विचारले जातात. त्यानंतरच जिल्हास्तरावर अंतिम निवड केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांना आपली बौद्धिक क्षमता लवचिक, सजग व सक्षम ठेवत मानसिक तयारी करावी लागते. भाग्यश्री पाटील हिने या सर्व टप्प्यांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या ऐतिहासिक परंपरेला साजेशी कामगिरी केली आहे. शाळेतील विज्ञान शिक्षक-शिक्षिकांनी तिला विषयानुरूप मार्गदर्शन केले. तसेच स्वाती माळी यांचे विशेष सहकार्य लाभले. तृतीय पात्रता फेरीसाठी भाग्यश्रीला मुंबई येथील डॉ. होमी भाभा संस्थानमध्ये वैज्ञानिक शैक्षणिक सहलीसाठी मुख्याध्यापकांसोबत आमंत्रित करण्यात आले आहे. या यशासाठी शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही. पी. बडवे, प्रशांत वंजारी, व्ही. एस. अमृतकर, डिंपल देसाई, श्रावण पाटील, रोहन मुंदडा, सविता पवार, योगिशा महाजन तसेच समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *