
अमळनेरच्या डॉ. हेमंत चौधरी यांची ऐतिहासिक कामगिरी; आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार
तेली समाजातील तालुक्यातील पहिले एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान; पालकांचाही गौरव

अमळनेर (प्रतिनिधी) : येथील साई पापड उद्योगाचे संचालक रविंद्र चौधरी व सरला चौधरी यांचे सुपुत्र डॉ. हेमंत चौधरी यांनी नुकतीच एमबीबीएस पदवी संपादन करून अमळनेर तालुका व परिसरातील तेली समाजातून पहिले एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळविला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माजी मंत्री तथा अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन चौधरी कुटुंबीयांचा सत्कार केला.
यावेळी आमदार पाटील यांनी डॉ. हेमंत चौधरी यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मुलाच्या यशामागील पालकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत रविंद्र चौधरी व सरला चौधरी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी तेली समाज पंच मंडळाचे अध्यक्ष संजय चौधरी, माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, उद्योजक चंद्रकांत चौधरी, देविदास देसले, भाजपाचे माजी शहराध्यक्ष शितल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, पत्रकार किरण पाटील, बाळासाहेब शिसोदे, गोविंदा बाविस्कर यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. डॉ. हेमंत चौधरी यांनी पालघर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते इंटर्नशिप करत असून त्यानंतर पदव्युत्तर (मास्टर) शिक्षण घेऊन अमळनेरमध्ये वैद्यकीय सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या यशामुळे चौधरी कुटुंबासह संपूर्ण तेली समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply