
“प्रशासनाचे पूर्ण अपयश! भटक्या कुत्र्यांनाच मतदार करा, जनता भीतीत जगतेय”
“जनतेचा जीव धोक्यात, प्रशासन मूकबधिर! कुत्र्यांनाच नागरिकत्व द्या नागरिकांची मागणी ”
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पळासदडे गावात भटक्या कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला असून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपरोधिक निवेदन दिले आहे.
गावातील भटक्या कुत्र्यांना पळासदडे गावाचा “रहिवाशी दाखला” द्यावा तसेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये त्यांना “मतदानाचा हक्क” द्यावा, अशी उपरोधिक मागणी करणारे निवेदन ग्रामसेवक तसेच गट विकास अधिकारी (बीडीओ) यांना ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले.दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, भटक्या कुत्र्यांबाबत अनेक वेळा ग्रामसभेत तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही होत नाही. कुत्र्यांचा गावात सतत वावर असून लहान मुले, महिला व वृद्धांना रस्त्यावरून जाणेही कठीण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा उपद्रव अधिक वाढत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

Leave a Reply