मारवड महाविद्यालयात ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत तीन विद्यार्थिनींना धनादेश वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विद्यार्थी विकास विभाग व मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचालित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना’ अंतर्गत तीन विद्यार्थिनींना धनादेशांचे वितरण करण्यात आले.

महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने ही योजना दरवर्षी राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत विद्यार्थी शिक्षण घेत असताना ऑफ तासिकांच्या वेळेत महाविद्यालयात विविध प्रकारची कामे करतात. त्या कामाच्या मोबदल्यात त्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये या योजनेअंतर्गत तीन विद्यार्थिनींना ग्राम विकास शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष देविदास शामराव साळुंखे, संचालक दिनेश वासुदेव साळुंखे, द मनोज हिंमतराव साळुंखे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले.

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. व्ही. डी. पाटील, विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे माजी जिल्हा समन्वयक डॉ. पवन पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. जितेंद्र माळी, सचिन पाटील तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *