नवदुर्गा गायन ग्रुप’च्या महिलांकडून बोरी माईचे पूजन; शहराच्या रक्षणासाठी केली प्रार्थना

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातून वाहणाऱ्या बोरी नदीला पावसामुळे महापूर आल्याने नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहराचे पुरापासून रक्षण व्हावे, तसेच परिसरातील भूजलपातळीत वाढ व्हावी, यासाठी नवदुर्गा गायन ग्रुप, अमळनेरच्या महिलांनी बोरी नदीकाठी जाऊन बोरी माईचे विशेष पूजन केले.

यावेळी महिलांनी बोरी माईला साडी-चोळी अर्पण करून नदीची ओटी भरली. तसेच नदीच्या पाण्याला विनंती करून अमळनेर शहर व परिसरातील नागरिकांना कोणतीही हानी होऊ नये, सर्वत्र सुख-शांती नांदावी, अशी प्रार्थना केली. या पूजनावेळी उज्वला शिरोडे, पुष्पा भामरे, मंगला ब्राम्हणकर, अनिता तिसे, स्वाती कोठावदे, भारती कुलकर्णी, मालती महिंद, उमा तिसा आणि कविता कोठावदे उपस्थित होत्या. नदीला पूर आल्यानंतर गावाच्या रक्षणासाठी नदीची पूजा करण्याची परंपरा अमळनेरमध्ये अनेक वर्षांपासून जपली जात आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *