स्वामिनारायण मंदिरात आजपासून संत पारायणातून देणार ‘अखंड सुख की प्राप्ती’चा संदेश

अमळनेर (प्रतिनिधी) श्रावण मासानिमित्त अमळनेर येथील बीएपीएस स्वामिनारायण मंदिरात संत पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. बीएपीएस स्वामिनारायण सत्संग मंडळ, अमळनेर यांच्या वतीने २ ते ६ सप्टेंबरदरम्यान दररोज रात्री ८ वाजता संत पारायण होणार आहे.

या पारायणात ‘अखंड सुख की प्राप्ती’ या विषयावर प्रवचन होणार असून, यासाठी अमळनेर येथील पूज्य अखंडमुनी स्वामी आणि सारंगपूर येथील पूज्य उत्तमसंकल्प स्वामी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

संत पारायणाच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक विचार, भक्ती आणि जीवनातील अखंड सुखाचा मार्ग याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे या धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन बीएपीएस स्वामिनारायण सत्संग मंडळ, अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

२ ते ६ सप्टेंबरदरम्यान रात्री ८ वाजता अमळनेर येथील बीएपीएस स्वामिनारायण मंदिरात होणाऱ्या या संत पारायणास भाविकांनी सपरिवार उपस्थित राहावे, असे आयोजकांनी कळविले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *