काळ्या फिती लावून शिक्षकांचा जुनी पेन्शनसाठी एल्गार

अमळनेर (प्रतिनिधी) : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मंगरूळ येथील स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १ सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून आंदोलन केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेले तसेच त्यानंतर १०० टक्के अनुदानावर आलेले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी १ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत काळ्या फिती लावून कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, अशोक सूर्यवंशी, प्रभुदास पाटील (अध्यक्ष, जुनी पेन्शन संघटना अमळनेर), संजय पाटील, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे, शितल चव्हाण, सिमा मोरे, श्रुती पाटील, सिमा पाटील, वस्ती शाळेचे मुख्याध्यापक भटू पाटील, तसेच प्रविण पाटील, मनोज पाटील, सुदर्शन पवार, प्रदीप पाटील, खुशाल पाटील आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. जुनी पेन्शन योजना ही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्यकालीन आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित असल्याने शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त तसेच त्यानंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *