
मंगरूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जितेंद्र भास्कर पाटील यांची निवड
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जितेंद्र भास्कर पाटील यांची बहुमताने निवड झाली. माजी उपसरपंच श्रुती श्रीकांत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी झालेल्या निवडणुकीत जितेंद्र भास्कर पाटील यांनी आठ विरुद्ध पाच मतांनी विजय मिळवत उपसरपंचपदावर विराजमान झाले.
उपसरपंच निवडीची प्रक्रिया लोकनियुक्त सरपंच समाधान पारधी यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पार पडली. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि नियमानुसार पार पडण्यासाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. एस. कठळे तसेच ग्रामविकास अधिकारी कैलास जाधव यांनी सहकार्य केले. निवडणुकीच्या वेळी माजी उपसरपंच श्रुती श्रीकांत पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य मुकेश रायभान पाटील, कावेरी निरंक पाटील, अनिल प्रकाश पाटील, छाया विजय पाटील, सुनंदा प्रभाकर पाटील, सुरेखा किशोर पाटील, दिनेश रतीलाल पाटील, रोशनी भटू पाटील, मिनाबाई रोहिदास घोलप आणि दीपक भगवान पाटील उपस्थित होते. उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर शरद साहेबराव पाटील, अमोल पाटील, किशोर पाटील, मिलिंद पाटील तसेच ग्रामस्थांनी जितेंद्र भास्कर पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, जितेंद्र भास्कर पाटील हे मंगरूळ येथील स्वर्गीय आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने विद्यालयातर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व ग्रामविकासासाठी त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
उपसरपंचपदी झालेल्या या निवडीमुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. नव्याने निवड झालेल्या जितेंद्र भास्कर पाटील यांनी ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply