गार्ड ऑफ ऑनर, पुष्पवृष्टीने साने गुरुजी विद्यालयात नवागतांचे उत्साहात स्वागत

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील साने गुरुजी कन्या हायस्कूल व साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षानिमित्त प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी नवागत विद्यार्थ्यांना गार्ड ऑफ ऑनर देत त्यांचे स्वागत केले, तर पायलट विद्यार्थ्यांनी त्यांना शाळेत प्रवेश देत सन्मानित केले.

यावेळी नवागत विद्यार्थ्यांची शालेय परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि आनंदी वातावरणात झालेल्या या स्वागत सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सहसचिव ॲड. अशोक बाविस्कर तसेच संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी केले. मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील संधी, शिस्त आणि शिक्षणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. नूतन माध्यमिक विद्यालयातील नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर तसेच साने गुरुजी कन्या हायस्कूलमधील नवीन विद्यार्थीनींवर शिक्षकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. धनगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुकेश पाटील यांनी केले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांना समाधान पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. नवागतांच्या स्वागतासाठी आयोजित या उपक्रमाचे पालक व उपस्थितांनी कौतुक केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *