द्वादशीचे औचित्य साधत महात्मा फुले कॉलनीत वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा घेतला संकल्प

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील पिंपळे रस्ता परिसरातील महात्मा फुले कॉलनीत आषाढी द्वादशीचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथील अंबरीष महाराज यात्रेच्या पावन पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमात नगरसेवक प्रविण गंगाराम पाटील (राजूदादा फाफोरेकर) तसेच नगरसेविका योगिता पाटील यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणानंतर प्रत्येक रोपाभोवती संरक्षक जाळ्या बसवून त्यांचे योग्य संवर्धन करण्याची खबरदारी घेण्यात आली.यावेळी नगरसेवक प्रविण गंगाराम पाटील आणि नगरसेविका योगिता पाटील यांनी उपस्थित नागरिकांना केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढीला हिरवाईचा वारसा देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षसंवर्धनात सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमात कॉलनीतील महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. तसेच आत्माराम चौधरी, प्रविण कोळी, सुरेश महाजन, शांतिलाल सोनवणे, अनिल वानखेडे, मीना बोरसे, मानसी सोनटक्के, आशा पाटील, कैलास चौधरी, अशोक कदम, समाधान पाटील, शांताराम जाधव, प्रथमेश कुलकर्णी, गोकुळ पाटील, मोहिनी पवार, संगिता चौधरी, प्रीती पाटील, रुपाली पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष जगविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आल्याने हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरला. नागरिकांनी लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारत हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक अमळनेर घडविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *