प्राचीन समाधीस्थळांचे संरक्षण करा; गोसावी समाजासाठी स्वतंत्र समाधीभूमीची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) खान्देश दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष भाऊसाहेब साहेबराव गोसावी यांच्या नेतृत्वाखाली खान्देश दशनाम गोसावी समाज, धुळे–जळगाव–नंदुरबार संस्थेच्या वतीने अमळनेर येथील प्रांत अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच नगरपालिका मुख्याधिकारी यांना समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.

अमळनेर शहरातील मंगळ ग्रह मंदिराजवळ असलेल्या गोसावी समाजाच्या प्राचीन समाधीस्थळांचे संरक्षण करण्यात यावे, तसेच विटंबना झालेल्या समाधींची तातडीने दुरुस्ती करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच गजानन महाराज मंदिराजवळ पूर्वी अस्तित्वात असलेल्या समाजाच्या जुन्या समाधी अतिक्रमण व बांधकामांमुळे आता दिसून येत नसल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. अमळनेर शहरात गोसावी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असून समाजासाठी कायमस्वरूपी समाधीभूमी उपलब्ध नाही. त्यामुळे शासनाच्या गावठाण अथवा उपलब्ध शासकीय जागेत गोसावी समाजासाठी स्वतंत्र समाधीभूमी राखीव करून देण्यात यावी, ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

समाजाच्या मागण्यांची संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक दखल घेतली. उपलब्ध शासकीय गावठाण जागेची माहिती तलाठी यांच्या माध्यमातून नकाशासह तपासून पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी शिवाजी आप्पा गोसावी (अमळनेर), वासुदेव (मोठाभाऊ) गोसावी – खान्देश जळगाव जिल्हा उपाध्यक्ष, किरण भारती – खान्देश धुळे जिल्हा उपाध्यक्ष, शरद (नाना) गोसावी – खान्देश खजिनदार, किरण गोसावी (नगाव) – खान्देश संचालक, रमेश (तात्या) गोसावी (नगाव), गजेंद्र सर (अमळनेर), माणिक सर, भिका दादा (नगाव), तुषार गोसावी (धार), सागर गोसावी (नगाव), मोतीलाल भारती, संजय गिरी गोसावी (नगाव), पप्पू गोसावी (नगाव), संतोष गोसावी (अमळनेर), बापू ज्ञानगिरी गोसावी, मुकेश गोसावी, सागर गोसावी (पोलीस पाटील, नगाव), अशोकगीर गोसावी (अमळनेर), विलास गोसावी (माजी उपसरपंच, मेथी), गोपाल गोसावी (संचालक, मजूर फेडरेशन, धुळे जिल्हा) यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *