अमळनेर आगारातील ‘इंदौर किंग’ एसटी चालक फारूक बागवान सेवानिवृत्त

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर आगारातील एसटी महामंडळाचे चालक फारूक हाजी गुलाब बागवान हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. अमळनेर–इंदौर मार्गावरील ड्युटी ते जास्त करत असल्याने डेपोतील सहकारी व प्रवासी त्यांना प्रेमाने ‘इंदौर किंग’ म्हणून संबोधत असत.

आपल्या सेवाकाळात त्यांनी नाशिक व जळगाव विभागात कार्य करत प्रवाशांना सुरक्षित, सुखकर आणि वेळेवर सेवा दिली. नाशिक येथे कार्यरत असताना त्यांनी कुंभमेळ्याच्या काळात विशेष सेवा बजावत उल्लेखनीय कामगिरी केली होती. सेवाकाळात त्यांनी अनेक लांबपल्ल्याच्या फेऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. विशेषतः

सेवानिवृत्तीच्या निमित्ताने स्मिता वाघ, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हीरेनजी रेडकर, उपाध्यक्ष किरण बिडवे, राज्यचिटणीस आर. के. पाटील, जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक दिलीप बंजारा, अमळनेर आगाराचे आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी, स्थानक प्रमुख अनिकेत नायदे यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी, कर्मचारी बांधव तसेच समाजबांधवांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *