अमळगाव सोसायटीच्या चेअरमनपदी संजय चौधरी; उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर शिंदे बिनविरोध निवड

अमळनेर (प्रतिनिधी) अमळगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादितच्या चेअरमनपदी संजय माधवराव चौधरी यांची, तर उपाध्यक्ष (व्हाईस चेअरमन)पदी ज्ञानेश्वर आनंदा शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीचे गावकऱ्यांनी स्वागत करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला.

संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या पदाधिकारी निवडीची बैठक दि. २४ जुलै रोजी संस्थेच्या कार्यालयात पार पडली. अध्यासी अधिकारी तथा मुख्य लिपिक एस. पी. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संस्थेच्या उपविधीनुसार चेअरमन व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने संजय माधवराव चौधरी आणि ज्ञानेश्वर आनंदा शिंदे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संचालक मिलिंद गुलाबराव पाटील, रावसाहेब देविदास पाटील, प्रवीण दगाजी पाटील, गिरीश सोनजी पाटील, पंकज सुरेश चौधरी, राजेंद्र साहेबराव पाटील, संजय भाऊराव पाटील, सुभाष शालिकराव पाटील, हिम्मत गटलू पारधी, प्रभावती आनंदसिंग पाटील, सुनीता शेखर पाटील तसेच संस्थेचे कर्मचारी रमेश दगडू माळी उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात निवड प्रक्रिया पार पडली असून उपस्थित सर्व संचालकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

नवनिर्वाचित चेअरमन संजय माधवराव चौधरी हे अमळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य असून त्यांचे वडील स्वर्गीय माधवराव देवचंद चौधरी हे गावातील ज्येष्ठ व अनुभवी राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील कार्याचा वारसा संजय चौधरी पुढे नेत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना संजय माधवराव चौधरी यांनी संचालक मंडळाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानले. संस्थेचा सर्वांगीण विकास, सभासदांचे हित आणि सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सर्व संचालकांना सोबत घेऊन एकजुटीने काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. त्यांना आमदार अनिल दादा पाटील यांचे मार्गदर्शन लाभत असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे किशोर पाटील, समाजाचे माजी अध्यक्ष शिवाजी चौधरी, प्रवीण चौधरी तसेच त्यांचे बंधू प्रदीप चौधरी यांचे सहकार्य लाभत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *