
गुलाब बोरसे यांची एकलव्य संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती
अमळनेर (प्रतिनिधी) गुलाब बोरसे यांची एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्यच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली. ही घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे तसेच राजेंद्र वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
या नियुक्तीमुळे उत्तर महाराष्ट्रातील संघटनेच्या कामकाजाला नवी गती मिळणार असल्याचे सांगण्यात आले. सामाजिक न्याय, शैक्षणिक प्रबोधन, युवक संघटन आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
नवनियुक्त अध्यक्ष गुलाब बोरसे यांनी संघटनेच्या विचारधारेप्रती निष्ठा राखत उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनात्मक जाळे अधिक मजबूत करण्याचे आश्वासन दिले. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी ठोस उपक्रम राबविणे, युवकांना दिशा देणे आणि सामाजिक ऐक्य बळकट करणे हे आपले प्राधान्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी गुलाब बोरसे यांचे अभिनंदन करून त्यांच्या नेतृत्वामुळे संघटनेला नवी उंची प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. यावेळी जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर, भैया सोनवणे, आबा बहिरम, अविनाश नगराळे, सुधाकर पवार, आनंद पवार, नरेश चव्हाण, अजय भाऊ, सागर भाऊ, ज्ञानेश्वर भाऊ, विकास भाऊ, धनराज मालचे, तुकाराम गायकवाड, धनराज पारधी, भुरा पारधी, संजू पारधी, मुकुंदा बोरसे आदींनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply