
एकल महिलांच्या आयुष्यात आशेचा दीप; राजरथ फाउंडेशनकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप
अमळनेर (प्रतिनिधी)जागतिक एकल महिला दिनानिमित्त राजरथ फाउंडेशन, अमळनेर यांच्या वतीने एकल महिला, त्यांच्या पाल्यांसह अनाथ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुनील पाटील व शिक्षिका पायल पाटील यांनी एकल महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच पात्र मुलांचे बाल संगोपन योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले. राजरथ फाउंडेशनतर्फे दरवर्षी सुमारे ५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले जाते. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच २०० हून अधिक एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Leave a Reply