आनोरे येथे तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; आईलाही मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) चुलत वहिनीला “तू मला खूप आवडते” असे बोलल्याच्या कारणावरून तालुक्यातील आनोरे येथील एका तरुणावर व त्याच्या आईवर लोखंडी रॉडने हल्ला झाल्याची घटना १५ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आनोरे येथील पंकज सुदाम पाटील याने आपल्या चुलत वहिनीला प्रेम व्यक्त केल्याने संबंधित महिला व तिच्या नातेवाईकांना राग आला. त्यानंतर भवरखेडा (ता. धरणगाव) येथील बापू पाटील यांनी पंकज याला समज देत असताना भावड्या पाटील, भूषण पाटील (रा. भातखंडे, ता. भडगाव) व बंटी पाटील (भडगाव) यांनी त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

यावेळी भूषण पाटील याने लोखंडी रॉडने पंकजच्या पायावर जोरदार वार केल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पंकजच्या आई मिनाबाई सुदाम पाटील यांनाही लोखंडी रॉडने हातावर मारहाण करण्यात आली.

या घटनेप्रकरणी संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११५(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *