नवोदय परीक्षेत हितांश पाटीलचे उज्ज्वल यश; ९८.७५% गुणांसह उल्लेखनीय कामगिरी

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी हितांश निंबा पाटील याने नवोदय प्रवेश परीक्षेत ९८.७५ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे शाळा व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हितांशने लहान वयातच अभ्यासात सातत्य, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ही यशस्वी कामगिरी केली आहे. नवोदय परीक्षेत मिळवलेले हे गुण त्याच्या बुद्धिमत्ता व परिश्रमाचे द्योतक मानले जात आहेत. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन हेमाकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक संजीव पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी हितांशचे कौतुक करत अभिनंदन केले. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्याला शुभेच्छाही देण्यात आल्या. शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला जात असून हितांशच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *