अमळनेरात गुढीपाडव्याला यंदाही निघणार हिन्दू नववर्ष स्वागत यात्रा

हिंदू नववर्ष स्वागत समितीची जय्यत तयारी, गुढीपाडव्याला शोभायात्रा निघणार

 

अमळनेर (प्रतिनिधी) हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे यंदा हिंदू नववर्ष स्वागत यात्रा गुरुवार दि. १९ मार्च रोजी गुढीपाडव्याला काढण्यात येणार आहे.

अमळनेर शहरातील राष्ट्रप्रेमी, धार्मिक, सामाजिक संस्थांच्या व मंडळांच्या सहकार्याने ही भव्य नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे. या यात्रेसाठी सर्व नागरिकांनी सकाळी आपले प्रांगण झाडून, सडा शिंपडून रांगोळ्या काढाव्यात, घरात रोषणाई करून भव्य गुढी उभारावी, पुष्पवृष्टी करून किंवा शक्य होईल त्या पध्दतीने शोभायात्रेचे स्वागत करावे. शिवाय मंगलवेश परिधान करून सहकुटूंब व मित्रमंडळींसह या यात्रेत सहभागी होऊन शोभा यात्रेचा आनंद लुटावा व भारतीय पध्दतीने नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन  करण्यात आले आहे. सदर हिंदू नववर्ष स्वागत यात्रा अमळनेरच नव्हे तर संपुर्ण जळगाव जिल्हा व खान्देशात प्रसिद्ध असून अनेक सामाजिक व धार्मिक संस्थांचे रथ व असंख्य हिंदू समाज बांधव यात सहभागी होत असतात. यंदाही स्वागत यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे.

 

शोभायात्रेचा असा आहे मार्ग

 

ही शोभायात्रा गुढी पाडव्याला १९ रोजी सकाळी ८ वाजता बन्सीलाल पॅलेस येथून निघून तेथून प्रताप मिल स्टेशन रोड, स्वामी नारायण चौक, सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, वाडी चौक, माळी वाडा, झामी चौक पोलीस चौकी, राजहंस चौक, पवन चौक, तिरंगा चौक पाचपावली देवी मंदिर, कोंबडी बाजार, विजय शॉपी, पोस्ट ऑफिस, बजरंग सुपर मार्केट, प्रताप मिल  येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिर येथे पोहोचून समारोप होईल.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *