अमळनेरात आज गोगाजी नवमीचा भव्य सोहळा; छडी मिरवणुकीने दुमदुमणार शहर

अमळनेर (प्रतिनिधी) : बाघड नरेश गोगा देवजी महाराजांचा जन्मोत्सव अर्थात श्री गोगाजी नवमीचा उत्सव अमळनेरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त रविवार, ६ सप्टेंबर रोजी भव्य महाआरती आणि छडी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री रामदेवजी बाबा ग्रुप, झामी चौक, नाथघराणा, अमळनेर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

सायंकाळी ५ वाजता श्रीमान जगनजी जैथे भगत, नाथ घरीयाणा, झामी चौक, अमळनेर येथून छडी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, धार्मिक वातावरणात गोगाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई उदय वाघ, माजी मंत्री तथा आमदार अनिल दादा भाईदास पाटील, माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी आणि नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत श्रीराम बाविस्कर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र मेहेतर समाज, भुसावळचे अध्यक्ष मिथुन बारसे आणि समाजसेवक, अमरावतीचे करण ढेढवाल राहणार आहेत. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून बुद्धाभैय्या जाधव (जामदार साहेब) आणि विक्कीआबा जाधव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अध्यक्ष महेश जाधव तर उपाध्यक्ष शक्ती दाभोडे आहेत.

छडी मिरवणूक सोहळ्यास उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, नगरसेवक विक्रांत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, मुंदडा बिल्डर्सचे अमेय मुंदडा, नगरसेवक साहेबराव पवार, पंकज चौधरी, दिपक चौगुले, अनिल महाजन, तुळशीराम हटकर, पत्रकार संजय पाटील, जितेंद्र ठाकुर, सूरज परदेशी, प्रताप शिंपी, रवी वर्मा, रामकृष्ण पाटील, प्रीतम धंडोरे, मुख्याधिकारी गणेश शिंदे, आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, रवी ज्वेलर्सचे रवी वर्मा आणि अमोल तांबोळी यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. बाघड नरेश गोगाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या या पावन पर्वानिमित्त सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छडी मिरवणुकीची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री रामदेवजी बाबा ग्रुप, झामी चौक, नाथघराणा, अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *