गरिबांचे संसार उद्ध्वस्त, मोठे प्रकल्प मात्र सुरक्षित?; अमळनेरात गोकलानी समूहावर आरोपांचा भडका

अमळनेरात गोकलानी समूहाविरोधात जनआक्रोश; घर पाडल्याच्या आरोपांपासून महसूल चौकशीपर्यंत प्रश्नच प्रश्न

“हक्कासाठी सुरू झालेल्या उपोषणाचा आज पहिला दिवस… मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार!”

अमळनेर (प्रतिनिधी) : गरिबांच्या नरड्यावर पाय देऊन त्यांना रस्तावर आणून स्वतःचे इमले उभारणाऱ्या सरजू गोकलानी यांच्या मिडटाऊन हॉटेलसह अन्य व्यावसायिकांच्या कुटनीतीवर आता सर्वसामान्यांकडून आग पाखड सुरू झाली आहे. कायदा सर्वांसाठी सारखा असून अशा आसुरी कौटल्यावर कारवाईसाठी सर्व स्तरातून दबाव निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यात हे कौटिल्य जेलमध्ये दिसल्यास आश्चर्य वाटू नये अशी स्थिती आता अमळनेर मध्ये निर्माण झाले आहे.

अमळनेर शहरातील शनी गल्ली न्यू प्लॉट परिसरातील देशमुख रहिवाशाचे घर जेसीबीच्या साहाय्याने पाडल्याच्या कथित प्रकरणासह सरजू गोकलानी यांच्या मिडटाऊन हॉटेलसह अन्य व्यावसायिक आस्थापनांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या विविध प्रश्नांमुळे शहरातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. या दोन्ही प्रकरणांत निष्पक्ष चौकशी, संबंधितांवर कारवाई आणि प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पुढे आली आहे. न्यू. प्लॉटमधील देशमुख चाळीतील शरद शिंदे यांचे राहते घर १० फेब्रुवारी २०२६ रोजी जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी केला होता . या प्रकरणात सरजू गोकलानी, महेश देशमुख यांच्यासह कथितरीत्या सहभागी असलेल्या इतरांवर तातडीने कारवाई करून अटक करावी तसेच संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली होती . प्रा. पवार यांच्या आरोपानुसार, घटनेनंतर अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास विलंब झाला. तसेच फिर्यादीवर तडजोड करण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सध्याच्या अधिकाऱ्यांकडून काढून घेऊन स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी करण्यात आली होती .

 

देशाच्या सुरक्षेसाठी सेवा बजावणारेही असुरक्षित!

 

देशमुख चाळीत सुमारे २० भाडेकरू राहत असून, त्यापैकी नयन शरद शिंदे आणि योगेश रमेश पवार हे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी सेवा बजावणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांनाच आपल्या घराबाबत असुरक्षितता निर्माण होणे ही गंभीर बाब असल्याचे प्रा. पवार यांनी म्हटले आहे. या कथित घटनेमुळे गरीब व महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत संवर्ग अधिकारी-कर्मचारी संघटनेचे नाशिक विभागाध्यक्ष सोमचंद संदानशिव यांनी सरजू गोकलानी यांच्या मिडटाऊन हॉटेलसह गोकलानी समूहाच्या अन्य व्यावसायिक आस्थापनांबाबत विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. मिडटाऊन हॉटेल, मल्टिप्लेक्स, मंगल कार्यालये, बँका तसेच इतर व्यावसायिक वापराच्या मालमत्तांवर नियमानुसार करआकारणी झाली आहे का? याची सखोल चौकशी करून नगरपरिषदेचा महसूल अबाधित आहे की नाही, हे स्पष्ट करावे, अशी त्यांची मागणी आहे.

 

करआकारणी, नोंदी आणि महसूलात दुजाभाव का ?

 

लहान व्यापाऱ्यांकडून कर वसुली करताना प्रशासन कठोर भूमिका घेत असेल, तर मोठ्या व्यावसायिक आस्थापनांबाबतही समान निकष लागू केले जात आहेत का, असा सवाल संदानशिव यांनी उपस्थित केला आहे. संबंधित मालमत्तांची करआकारणी, नोंदी आणि महसूल तपशील प्रशासनाने तपासून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याशिवाय सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न आणि गलवाडे रस्त्यावरील ठगू आई रिसॉर्ट परिसरातील कथित अतिक्रमणाचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. विकास आराखड्यातील रस्ता अडविण्यात आला असल्यास प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून तो नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा

 

या सर्व मागण्यांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आज स्वातंत्र्यदिन अर्थात १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा सोमचंद संदानशिव यांनी दिला आहे.

दरम्यान, या दोन्ही प्रकरणांतील आरोपांची स्वतंत्र आणि अधिकृत पडताळणी होणे आवश्यक असून, संबंधित व्यक्ती, गोकलानी समूह, पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप पूर्णपणे समोर आलेली नाही. संबंधितांची बाजू उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

आमदार, खासदारांना कारवाईसाठी साकडे

 

दरम्यान, या प्रकरणाची आमदार अनिल भाईदास पाटील आणि खासदार स्मिताताई वाघ यांनी गंभीर दखल घेऊन प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. न्यू प्लॉट प्रकरणामुळे निर्माण झालेली भीती आणि गोकलानी समूहाच्या व्यावसायिक आस्थापनांबाबत उपस्थित झालेले प्रश्न यामुळे ‘अमळनेरात कायदा सर्वांसाठी समान आहे का?’ हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

 

सरजू गोकलानीचा भरला पापाचा घडा !

 

सरजू गोकलानी याचे आपले बेकायदेशीर व्यवसाय आणि पालिकेशी संबंधित कामे सुरळीत सुरू राहावीत यासाठी स्थानिक निवडणुकीत विरोधकांना कोट्यवधी रुपयांची रसद पुरवून अभ्यासू नेतृत्वाला डावलल्याचा व राजकीय हस्तक्षेप करण्यात मोठा वाटा आहे. आपले उल्लू सीधे करण्यासाठी यांना अभ्यासू नगरसेवक अडचणीचे ठरू नये म्हणून त्यांना निवडणुकीत पाडण्याचे पातक यांनी केले आहे. त्यामुळे आता त्यांच्या पापाचा घडा भरला आहे. तो अमळनेरकर लवकरच फोडणार असल्याने त्यांनाही जेलची हवा खावी लागणार आहे, असे वातावरण तयार झाले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *