गीत बहार म्युझिकल ग्रुपतर्फे शनिवारी मराठा मंगल कार्यालयात रंगणार अजरामर गीतांची मैफल

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील प्रसिद्ध गायक-कलाकारांनी स्थापन केलेल्या गीत बहार म्युझिकल ग्रुपतर्फे जुन्या-नव्या अजरामर गीतांवर आधारित ‘सुरीला सफर’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता मराठा मंगल कार्यालय, अमळनेर येथे करण्यात आले आहे. ग्रुपचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम असून, संगीतप्रेमी अमळनेरकरांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आलेल्या या सुरेल मैफलीत शहरातील नामवंत गायक-कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

या कार्यक्रमात पूर्वा वशिष्ठ, शुभांगी खंडाळे, उज्वल पाटील, अनिल बनसोडे, शाम संदानशिव आणि सुनिल भोई हे गायक जुन्या-नव्या अजरामर गीतांचे सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन पूजा शहा करणार आहेत.

गीत बहार म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून अमळनेरकर रसिकांना यापुढेही दर्जेदार, श्रवणीय आणि वैविध्यपूर्ण सांगीतिक कार्यक्रम सादर करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *