
अमळनेर येथील प्रबुद्ध विहारात सम्राट अशोक जयंती अमळनेर येथे उत्साहात साजरी
अमळनेर (प्रतिनिधी) जंबुद्वीपचे निर्माता, राजा चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३३० वी जयंती अमळनेर येथील प्रबुद्ध विहारात समता सैनिक दलाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात सम्राट अशोक यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात समता सैनिक दलाचे जळगाव जिल्हा पश्चिम प्रमुख सुनील करंदीकर, भारतीय दलित साहित्य अकादमीचे जिल्हाध्यक्ष अतुल डोळस यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते हृदयनाथ मोरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आनंदा सोनवणे तसेच केंद्रीय शिक्षक सिद्धार्थ सोनवणे हेही प्रबुद्ध विहार येथे उपस्थित होते. कार्यक्रमास प्रबुद्ध कॉलनीतील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply