
अमळनेरात आज ‘कुबेर का खजाना’ कार्यक्रम; राज दीदींच्या मार्गदर्शनातून जीवन परिवर्तन व आर्थिक समृद्धीचा मंत्र
अमळनेर (प्रतिनिधी) नारायण रेकी सत्संग परिवार, अमळनेर यांच्या वतीने आज, रविवार दि. १४ जून रोजी ‘कुबेर का खजाना’ या विशेष प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ल्ड रिनाऊन्ड लाईफ ट्रान्सफॉर्मेशनल स्पीकर तथा नारी रत्न श्रीमती राजेश्वरी जी मोदी (राज दीदी) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार असून शहरातील नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राज दीदी जीवनातील सकारात्मक बदल, मानसिक शक्ती, आत्मविश्वास, आर्थिक समृद्धी आणि यशस्वी जीवनशैली या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. ‘कुबेर का खजाना’ या संकल्पनेद्वारे जीवनातील संधींचा योग्य उपयोग करून आर्थिक आणि वैयक्तिक प्रगती कशी साधता येते, याबाबत त्या उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
देश-विदेशात आपल्या प्रेरणादायी व्याख्यानांमुळे आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या कार्यक्रमांमुळे ओळख निर्माण केलेल्या राज दीदी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी अमळनेरसह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. जीवनात सकारात्मक ऊर्जा, आत्मविकास आणि आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक विचारसरणी याबाबत त्या मार्गदर्शन करणार असल्याने कार्यक्रमाबाबत विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन नारायण रेकी सत्संग परिवार, अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले असून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शीतल मनीष वर्मा यांच्यासह श्रुती मुंदडा, दीपिका अग्रवाल, संगीता मुंदडा, सुनीता शर्मा, नीलिमा माहेश्वरी आणि अन्य महिला कार्यकर्त्या परिश्रम घेत आहेत. आयोजकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. जीवन परिवर्तन आणि आर्थिक समृद्धीच्या दिशेने प्रेरणा देणारा हा कार्यक्रम अमळनेरकरांसाठी एक विशेष पर्वणी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply