प्रताप महाविद्यालयाच्या मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या केंद्र संयोजकपदी प्रा. डॉ. कैलास निळे

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या केंद्र संयोजकपदी प्रताप महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. कैलास सुभाष निळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या वतीने ही नियुक्ती करण्यात आली असून मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रा. डॉ. कैलास सुभाष निळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रा. डॉ. कैलास सुभाष निळे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रताप महाविद्यालयात भूगोल विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अध्यापनासोबतच त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राची शैक्षणिक कार्यपद्धती अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने केंद्र संयोजक म्हणून प्रा. डॉ. कैलास सुभाष निळे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा अभ्यास केंद्राच्या कामकाजाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या नियुक्तीबद्दल प्रताप महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि कर्मचारीवृंद यांनी प्रा. डॉ. कैलास सुभाष निळे यांचे अभिनंदन केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *