वेतनातील तफावत दूर करण्यासाठी शासकीय व नीमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेचे असहकार आंदोलन

अमळनेर (प्रतिनिधी) वेतनातील तफावत दुर करण्याच्या मागणीसाठी जय महाराष्ट्र शासकीय व नीमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेने दिनांक 24 फेब्रुवारीपासून असहकार / कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कामकाजवर परिणाम होत आहे.

    यासंदर्भात संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संघटनेने शासनास दिलेले लिपीक संवर्गातील वेतनत्रुटी संदर्भातील प्रकरण दिर्घ काळापासुन प्रलंबित आहे. संघटनेने यापुर्वी संबंधित मागण्यांबाबत वारंवार शासनास निवेदने दिलेले असून मुंबई व नागपूर येथे आंदोलन केलेले आहेत. परंतु वेतनत्रुटीबाबत अद्यापही शासनाने समाधानकारक निर्णय घेतलेला नाही.लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतन निर्धारणातील गंभीर त्रुटींबाबत प्रशासनास वांरवार निवदेन देवुनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे अर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य संघटनेच्या निर्देशानुसार दि. 24 फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोनल करण्यात येत आहे, असे अध्यक्ष मानव पाटील, सचिव दिपक पाटील व उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी म्हटले आहे.

 

संघटनेच्या प्रमुख मागण्या अशा 

 

चौथ्या वेतन आयोगापासून लिपीग वर्गीय संवर्गातील कर्मचारी यांची वेतनत्रुटी दुर करणे, लिपिक वर्गीय संवर्गाचे पदांची संख्या कमी न करता पदोन्नतीचे स्तर कमी करणे, लिपिक वर्गीय संवर्गाचे पदांचे नामकरण विकास अधिकारी व प्रशासन अधिकारी याप्रमाणे करणे,1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागु करणे, अनु. जाती, जमाती, इमाव, व्हीजेएनटी, एनटी यांचे पदोन्नतीमधील आरक्षण पुर्वीप्रमाणे लागू करणे, सरळसेवेमधील मागासवर्गीय आरक्षण पदे भरणे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *