भू-करमापक” अधिकारी म्हणून निवड झालेल्या वैष्णवीचा नवलभाऊ शैक्षणिक परिवारातर्फे विशेष सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे वरिष्ठ लिपिक प्रेमराज सूर्यवंशी यांची सुकन्या वैष्णवी प्रेमराज सूर्यवंशी हिची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख नाशिक विभागात “भू करमापक” अधिकारी म्हणून निवड झाली. या पार्श्वभूमीवर तिचा व तिच्या पालकांचे नवलभाऊ शैक्षणिक परिवारातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

वैष्णवी सूर्यवंशी हिने सरळ सेवा परीक्षेमध्ये अभ्यास करून अधिकारी पदावर गगन भरारी घेतलेली आहे .सामान्य कुटुंबातील या विद्यार्थिनीने दुर्दम्य इच्छाशक्ती व आत्मविश्वासच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.   नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड, प्रशासकीय अधिकारी प्रा. शाम पवार, नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, निवृत्त प्राचार्य डि.के पवार, राज्य सैनिकी शाळा असोसिएशनचे कार्यकारी सदस्य उमेश काटे, प्रा. डॉ. हुकूमचंद जाधव आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत  वैष्णवी हिचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय उभाळे हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला प्रा. डॉ. यु. वाय. गांगुर्डे, प्रा. डॉ. एन. झेड. पाटील, डॉ. एस. जे. पाटील, प्रा. डॉ.के. डी बागुल, प्रा. शिवाजी सूर्यवंशी, प्रा. विजय शिंदे, प्रा. सुजाता निकम, प्रा. छाया पाटील यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. वैष्णवी हिच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, संस्थेच्या प्रमुख मार्गदर्शिका शिलाताई पाटील, संस्था कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रियदर्शनी पाटील, प्रशासकीय अधिकारी एल. डी. पाटील, प्रशासकीय अधिकारी बी. टी. पाटील आदींनी स्वागत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *