पळासदडे गावची कन्या तनूजा पाटीलचा जी-पॅट परीक्षेत यश

पळासदडे (प्रतिनिधी) येथील कुमारी तनूजा अरुण पाटील हिने ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (जी-पॅट) २०२६ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने २३२ गुण मिळवत ऑल इंडिया रँक ११२८ प्राप्त केली आहे.

तनूजा ही पळासदडे गावचे माजी सरपंच अरुण भगवान पाटील यांची कन्या असून, तिच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि कष्ट यांच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे.

तनूजाच्या या यशाबद्दल गावातील नागरिक, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून पळासदडे गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे. तिच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *