
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जयश्रीताई पाटील यांचा वाढदिवस साधेपणानेसाजरा ; शुभेच्छांसाठी दिवसभर रीघ
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासह मान्यवरांचे दूरध्वनीवरून अभिनंदन; जिल्हा बँकेवरील बिनविरोध निवडीचेही कौतुक

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालिका तथा माजी जिल्हा परिषद सदस्या व माजी नगराध्यक्षा जयश्रीताई अनिल पाटील यांचा वाढदिवस माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्यात आला.
अमळनेर तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचे भान राखत वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनीही साधेपणाने शुभेच्छा दिल्या. मात्र, जयश्रीताई पाटील यांच्याविषयी असलेल्या प्रेमापोटी हितचिंतक आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी दिवसभर गर्दी केली.
तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीच्या वतीने वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे विनम्र आवाहन करण्यात आले होते. वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्याची भूमिका पक्षाकडून मांडण्यात आली होती. या आवाहनाला सर्व स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. जयश्रीताई पाटील यांनी नेहमीच सामाजिक कार्याला प्राधान्य दिले असल्याने त्यांच्या प्रेमापोटी शेकडो हितचिंतक आणि कार्यकर्त्यांनी निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, जळगाव जिल्हा बँकेत अमळनेर तालुक्यातून प्रथमच जयश्रीताई पाटील यांच्या रूपाने महिला संचालिकेची बिनविरोध निवड झाल्याने या कामगिरीबद्दलही त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी कायम होती. यामध्ये महायुती व सर्वपक्षीय पदाधिकारी, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शेतकी संघ, फ्रुटसेल, मार्केटचे पदाधिकारी, ग्रामीण भागातील सरपंच, विविध विकास सोसायट्यांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, आजी-माजी नगरसेवक, सामाजिक व व्यापारी क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बांधव, महिला भगिनी आणि तरुण कार्यकर्त्यांचा समावेश होता.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासह जिल्हाभरातील ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांनीही दूरध्वनीद्वारे जयश्रीताई पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply