दहिवदसह अमळनेर शहरात दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद येथे तसेच अमळनेर शहरातील वाडी चौक परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या दोन्ही प्रकरणांची अमळनेर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दहिवद येथील राहुल दत्तात्रय सोनार (वय २९) यांनी ५ ऑगस्ट रोजी सकाळी राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेतल्याची घटना घडली. ही बाब लक्षात येताच दत्तात्रय सोनार, शिवाजी पारधी, प्रवीण माळी, चेतन माळी आणि रोशन यांनी राहुल सोनार यांना खाली उतरवून तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत. दरम्यान, अमळनेर शहरातील वाडी चौक परिसरातही अशीच घटना घडली. दीपक विठ्ठल गुरव (वय ५२) यांनी स्वतःच्या राहत्या घरातील छताला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतल्याची घटना घडली. नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर दीपक गुरव यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी त्यांच्या शालकाने अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भारतीय न्याय संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत. दोन्ही घटनांमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *