
आज गोकुळाष्टमीला गोशाळेत गोसेवेचा जागर; गोमातेसाठी पशुखाद्य वाटप उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) : श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमीनिमित्त पळासदडे रोडवरील श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गोशाळेत आज, ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता गोसेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप, अमळनेर आणि मोहन कृषी उद्योगचे संचालक गोविंद अग्रवाल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गोमातेसाठी पशुखाद्य वाटप करून गोसेवा करण्यात येणार आहे. गोपालन आणि गोसेवेचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे तसेच गोमातेप्रती सेवाभाव निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमासाठी उपस्थित भाविकांसाठी फलाहाराची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती उद्योजक गोविंद अग्रवाल यांनी दिली. या पुण्यकार्यात जास्तीत जास्त महिला व पुरुष भाविकांनी उपस्थित राहून गोसेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप, अमळनेर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply